स्व-संवाद…


कोणाशी? स्वतःचा स्वतःशी...

कशासाठी? स्वतःची ओळख होण्यासाठी...









स्व-संवाद म्हणजे स्वतःशी केलेला संवाद.

हा स्वतः स्वतःशी केलेला संवाद ज्यामुळे आपल्याला आपल्यातील अप्रत्यक्ष बदल समजून येतात. आपल्या मनातील विचार आणि भावना यांचे आपल्यालाच आकलन आणि पर्यायाने त्याचे प्रकटीकरण होते.

तसे तर आपल्या डोक्यात दिवसरात्र काही ना काही विचार चालू असतात परंतु या विचारांपैकी आपल्याला उपयोगी असे फक्त ५% विचारच असतात. बाकी विचारांची आपण दखलही घेत नाही पण ह्या विचारांच्या सततच्या असण्यामुळे डोक्यात गोंधळ तेवढा वाढतो.

आणि म्हणूनच स्व-संवादाचा अभ्यास आत्मविश्वास आणि आत्म-अभिवृद्धीसाठी मदत करतो. स्व-संवादाच्या माध्यमातून आपण स्वतंत्रपणे आणि स्वाधीनपणे बोलतो आणि त्यामुळे आपल्या मनात असलेल्या विश्वाच्या सौन्दर्याचा आणि प्रेरणेचा अनुभव आपणच नव्याने घेत राहतो.

ज्या प्रकारे आपल्याला जीवन जगण्यासाठी अन्न-पाणी यांची आवश्यकता असते त्याच प्रमाणे आपल्याला मानसिक दृष्ट्या निरोगी रहाण्यासाठी स्व-संवादाची गरज असते. त्याकरिता दिवसातील थोडा वेळ काढून स्वतःला प्रश्न विचारून स्वतःच त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा. हे एक सोपे तंत्र आहे जे थोड्याच काळात आपण आत्मसात करू शकतो आणि त्याचा प्रभावी वापरही करू शकतो.

हा स्वतः स्वतःशी केलेला संवाद ज्यामुळे आपल्याला आपल्यातील अप्रत्यक्ष बदल समजून येतात. हळूहळू आपल्याला जाणवू लागते की आपल्या मनातील आजचा विचार हा कालच्या विचारापेक्षा जास्त प्रभावी, परिपक्व आहे.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी संवादाचे महत्व जाणून इतरांशी संवाद कसा साधायचा याचे तंत्र आत्मसात केलेले असेल, परंतु हे करत असताना आपण आपल्याशी योग्य संवाद साधतो का हे बघण्याची खूप गरज आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्यावर मनातील चित्रांचा, घटनांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे आपल्या स्व-संवादाचाही परिणाम होत असतो. आपण ज्या स्वरात आपल्या स्वतःशी बोलतो त्यावरून आपला मूड तयार होत असतो. जर आपण निराशेच्या, दुःखाच्या सवयी लावल्या तर तसं जीवन निर्माण होतं याउलट म्हणूनच जर आपण आनंदी, यशस्वी, उत्साही सवयी लावल्या तर आपण समाधानी जीवन जगतो.



Post a Comment

Previous Post Next Post