नवीन नात्याच्या उंबरठ्यावर...
अंकिता एक लग्नाळू मुलगी.. छान शिकलेली आणि आता नातेवाईकांकडून लग्नासंदर्भात विचारपूस सुरु झालेली... आई वडिलांनी लग्नासंदर्भात विचारले परंतु शिक्षण आणि नंतर नोकरी त्यामुळे तिने कधी या विषयावर विचारच केला नव्हता...
सध्या केवळ अंकिताचीच अशी अवस्था नाहीये.. बहुतांशी जणांची हीच अवस्था आहे. लग्न करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे.. खरंतर आई वडील यांच्याशी जर चर्चा होऊ शकली तर ते खूप उत्तम ठरेल परंतु तसे होणार नसेल तर कोणा माहितगार व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. त्याचबरोबर स्वतःने देखील जागरून राहून “मला जोडीदार कसा हवा आहे किंवा कशी हवी आहे...?” याचा विचार करायला हवा...
लग्न झाल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींबाबत तडजोड करू शकतो आणि कोणत्या गोष्टींबाबत आजिबात तडजोड करू शकत नाही हे मनाशी ठरवलं पाहिजे. तसेच लग्न का करतोय हे स्वतःला समजणे पण खूप महत्वाचे आहे..
पूर्वीच्या काळी हे समजून घेण्याचा पर्याय मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणाकडेच नव्हता कारण आई वडील ठरवतील तेच होणार हे माहित होते परंतु सध्याच्या बदलत्या जगात आता दोघेही आपण आपलं आयुष्य कसे जगणार आहोत हे ठरवतात म्हणून लग्न का करणार आहोत हे देखील ठरवणं महत्वाचं...
प्रयेक व्यक्तीच्या सुखाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. जसं कोणी दिवसात एकदाच चहा पिऊन सुखी असतो तर कोणाकोणाला थोडा थोडा करत दिवसभर चहा हवा असतो म्हणूनच आपण आपलं सुख कशात आहे याचा शोध घ्यावा आणि त्याच दिशेने प्रवास करावा.
आता आपण परत आपल्या गोष्टीकडे म्हणजेच अंकिताकडे वळूया... मग यानंतर अंकिताने काय केले? तर तिने स्वतः विचार करून स्वतःचा बायो-डेटा तयार केला. त्यात तिने तिला काय आवडतं आणि काय आजिबात आवडत नाही याचा विचार केला. हे सगळे ती तिच्या आई वडिलांशी बोलली आणि मग आई वडिलांनादेखील तिच्या आवडीचा जोडीदार शोधणे सोप्पे झाले...
Post a Comment